Pune : गणेशोत्सव मंडळांतर्फे शुक्ला यांना निरोप व सन्मान

एमपीसी न्यूज – पुण्यातील  गणेशोत्सव मंडळांनी वेळोवेळी मला साथ दिली. माझ्या सुख दु:खात सर्वजण सहभागी झाले. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाला आणि गणपती मंडळांना कधीही विसरणार नाही. पुणेकरांचे प्रेम व गणपतीचा आशिर्वाद सदैव माझ्या पाठिशी असेल, अशा शब्दांत पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गणेशोत्सव मंडळांचे आभार मानले.

पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे विश्वस्त व पदाधिकारी यांनी एकत्रितपणे पोलीस आयुक्तालयात पुण्याच्या मावळत्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा सन्मान केला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, संजय मते, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, महेश सुर्यवंशी, सुनील रासने, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, बाबूगेनू मंडळाचे बाळासाहेब मारणे, साखळीपीर तालीम मंडळचे रवींद्र अण्णा माळवदकर, नातूबाग मंडळाचे प्रमोद कोंढरे,हनुमंत शिंदे, यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

रश्मी शुक्ला म्हणाल्या, गणेश मंडळांनी आज केलेल्या सन्मानाने मी भारावून गेले आहे. आज मला माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. माझ्या तीस वर्षांच्या नोकरीमधील हा पहिला प्रसंग आहे ज्यामध्ये पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांनी माझा सन्मान केला. या सगळ्यांची मी आभारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.