Pune : सराईत गुन्हेगार सुनील उर्फ चॉकलेट सुन्या गजाआड

एमपीसी न्यूज- खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या तब्बल 25 गंभीर गुन्हे असलेला अट्टल गुन्हेगार सुनील उर्फ चॉकलेट सुन्या अखेर गजाआड झाला. गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली.

एक इसम दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पर्वती पायथ्याच्या रस्त्यावर दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली असता पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन संबंधित इसमाला ताब्यात घेतले असता गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार सुनील उर्फ चॉकलेट सुन्या (वय, 33, रा. पर्वती ,पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले व चार काडतुसे असा तब्बल 1 लाख 200 रुपयांचा माल जप्त केला.

सुनील उर्फ चॉकलेट सुन्या याच्यावर दोन खून, सहा खूनाचे प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी यासारखे तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठ महिन्यापासून पर्वती पायथ्याजवळ जागा बदलून राहत होता. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.