Pune: जमावबंदी, वाहनविषयक आदेशाच्या शंकांचे उत्तर देण्यासाठी पोलिसांनी जाहीर केले ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या जमावबंदी, वाहन विषयक आदेशाबद्दल नागरिकांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी आणि विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी पुणे पोलिसांनी व्हॉट्सॲप क्रमांक निर्धारित केले आहेत. नागरिकांच्या शंका असल्यास, सुट देण्याची विनंती केल्यास या 9145003100, 8975283100, 9169003100 आणि 8975953100 व्हॉट्सॲप क्रमांकावरुनच नागरिकांना उत्तर दिले जाणार आहे.

कोरोना विषानूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा देखील बंद केल्या आहेत. पुणे शहरातील अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतुकीवर देखील निर्बंध घातले आहेत. त्याबाबतचे विविध निर्णय पोलिसांकडून घेतले जात आहेत.

त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या कलम 144 आदेशाबद्दल तसेच वाहन विषयक आदेशाबद्दल नागरिकांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी आणि विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी पुणे पोलिसांनी व्हॉट्सॲप क्रमांक निर्धारित केले आहेत. नागरिकांच्या शंका, प्रश्नांना या व्हॉट्सॲप क्रमांकावरुनच 9145003100, 8975283100, 9169003100 उत्तर दिले जाणार आहे.

विनंतीवर विचार केल्यानंतर, शंकांना अथवा सूट देण्याच्या विनंतीवरील उत्तर, नागरिकांना या व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश स्वरुपात पाठवले जाईल. सूट ही केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाईल, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.