Pune : पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

विशाल सज्जन फाळके (वय 27, रा. वायफळ, ता. तासगाव, जि. सांगली) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार पुणे-बेंगलोर महामार्गावर आम्रपाली हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलीस शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आम्रपाली हॉटेल परिसरात सापळा रचून विशाल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा 60 हजार 800 रुपयांचा ऐवज मिळाला. पिस्तूल आणि काडतुसे जप्त करत पोलिसांनी विशाल याला अटक केली.

विशाल याच्यावर सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. तर पुणे शहरातील भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल आहे. विशाल याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.