Pune Police : कोयता गॅंगची भर रस्त्यात हलगी वाजवून धिंड

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसानी भर रस्त्यात दहशत (Pune Police) माजवणाऱ्या कोयत्या गॅंगची रग ही भर रस्त्यात मिटवली आहे. भर रस्त्यात हलगी वाजवून धिंड काढून दहशतीचा चक्काचूर केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गॅंग दहशतीचे रूप घेत आहे. कोयत्याने व्यापारी, सामान्य नागरिकांना लुटणे, खून करणे, सामान्य लोकांच्या स्टॉल, दुकानांचे नुकसान करणे हे प्रकार पुण्यात वाढत चालले आहेत. त्यासाठी पुणे पोलिसही अॅक्शन मोडवर आहेत.

दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची पुणे पोलिसांनी हलगी वाजवत भर रस्त्यात वरात काढली. त्यांची ही धिंड पाहून अनेक व्यापाऱ्यांना आनंद झाला. जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी घातक शस्त्र जमा करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. हा सगळा प्रकार पुण्यातील कोंढवा भागात घडला. त्या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत.

Bhosari news : एमआयडीसी भोसरी पोलिसांनी महिलेचे हरवलेले दागिने परत मिळवून दिले

पुणे पोलिसांनी कोयता गॅंगच्या विरोधात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यास (Pune Police) सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत 700 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून अनेक आरोपींना पोलिसानी अटक केली आहे. यामध्ये या गँगचा प्रमुख बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.