BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना दिल्लीचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – प्रोकलमेशन वारंटची अंमलबजावणी न करण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच स्विकारणा-या दिल्ली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 25 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज शनिवारी (दि. 15) पुणे रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल होमलँड समोर करण्यात आली.

लेहरीसिंग लिलासिंग (वय 54) असे लाच स्विकारणा-या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तक्रारदार यांच्याविरूद्ध नवी दिल्ली येथील मेट्रोपोलिटन न्यायालयाकडून प्रोकलमेशन वॉरंट काढण्यात आले होते. या वारंटची अंमलबजावणी करण्यासाठी नवी दिल्ली येथील चित्तरंजन पार्क पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लेहरीसिंग लिलासिंग पुण्यात आला होता.

पुण्यात आल्यानंतर हे वारंट न बजावण्यासाठी लेहरीसिंग यांनी तक्रारदाराकडे 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर या तक्रारीची तपासणी करून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल होमलँड समोर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3