Pune Police : पुणे शहर पोलिस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांची मोठी बातमी समोर (Pune Police) येत आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. 

ससून रुग्णालयातून स्वाती मोहोळ धमकी दिल्याप्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. याप्रकरणी पोलिस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे हे दोघे ही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते.  याच 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या रखवालीतून मार्शल लीलाकर या आरोपीने पळ काढला होता.

Pune : कर्नाटकचा कुख्यात गुंड पर्वती पोलिसांच्या ताब्यात; अनेक महिन्यांपासून कर्नाटकमधून होता फरार

दुसऱ्या प्रकरणात, पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पोलीस दलातील 3 जण दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत (Pune Police) कार्यरत असणारे एक अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.