Pune Police : नेमबाजीत अव्वल! महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत पुणे पोलीस दलातील 11 जवानांना पदक

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत पुणे पोलिस (Pune Police) दलास नेमबाजीत घवघवीत यश मिळाले. शुटींग पुरूष, शुटींग महिला आणि शुटींग सर्व्हिस वेपन या तिन्ही प्रकारात विजेते पदाचे कप मिळविण्यात यश मिळाले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी विजेत्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

पुण्यातील रामटेकडी येथील एसआरपीएफ मैदानावर महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेत राज्यातील विविध पोलीस विभागातून संघ सहभागी झाले होते. त्यातील नेमबाजीत पुणे पोलिसांना घवघवीत यश मिळाले आहे. सर्व नेमबाज स्पर्धकांनी आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडून नेमबाजीचा सराव करून हे यश संपादित केले आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, राखीव पोलीस निरीक्षक किशोर टेंभुर्णे व राखीव उपनिरीक्षक हटकर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेकांनी पदके मिळवली आहेत.

पदक मिळाले पोलीस अधिकारी व कर्मचारी…Pune Police
1. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण
2. सहाय्यक निरीक्षक राकेश कदम
3. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे
4. पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील –
5. पोलीस अंमलदार अमोल नेवसे
6. पोलीस अंमलदार महेश जाधव
7. पोलीस अंमलदार अनिल उकरे
8. पोलीस अंमलदार मंगेश खेडकर
9. पोलीस अंमलदार दत्तात्रय खाडे
10. पोलीस अंमलदार यास्मीन सय्यद
11. पोलीस अंमलदार वैशाली गोडगे

Pimpri News : जाधववाडीतील उर्दू शाळेची अवस्था बिकट; उच्च न्यायालयात सुनावणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.