Pune News : पोलीस पतीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पत्नीने विषारी औषध पिऊन..

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून 30 वर्षीय पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खडक पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकुमार तात्याबा शिंदे (42) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या 30 वर्षीय पत्नीने तक्रार दिली असून याप्रकरणी पती, सासू व नणंद यांच्यावर खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि राजकुमार शिंदे यांचा 2008 साली प्रेमविवाह झाला. लग्न झालेले असतानाही राजकुमार शिंदे यांचे बाहेर दोन ते तीन महिलांसोबत अनेतिक संबंध असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली होती. फिर्यादीने याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.

त्यानंतर राजकुमार शिंदे यांनी घरातील सर्व साहित्य आणि मुलांना घेऊन दुसरीकडे राहण्यासाठी गेले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने त्यांना वारंवार फोन केला असता प्रतिसाद दिला नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादी महिला या मानसिक तणावाखाली होत्या. यातून त्यांनी फरशी पुसण्याचे विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खडक पोलिसांना हे समजल्यानंतर त्यांनी त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.