Pune : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची दत्तक योजना

एमपीसी न्यूज- शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच लहान मुलांवर होणारे अनैसर्गिक अत्याचार रोखण्यासाठी पोलीस उप अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दत्तक योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक शाळेसाठी एका पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अलीकडेच नवनीत कावत यांनी सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक घेऊन पोलीस दत्तक योजनेची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा संपर्क क्रमांक शाळेतील प्रत्येक मुलाकडे देण्यात येणार असून त्यांना कुणी त्रास देत असेल किंवा त्यांच्या आसपास कोणत्याही चुकीच्या घटना घडत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देता येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडे आपल्याला नमूद दिलेल्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. गुड टच, बॅड टच, छेडछाड, भांडणे, मारामारी, गुन्हेगारी या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती दूर करण्याचे काम करतील.

पोलीस आपल्या मदतीसाठी असून चुकीचे वर्तन झाल्यास ते कारवाई देखील करतील अशी भावना लहान मुलांच्या मनामध्ये निर्माण व्हावी असा नवनीत कावत यांचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.