BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शरद पवारांच्या गुगलीवर पृथ्वीराज चव्हाणांचा ‘सेफ शॉट’

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फिरकी गोलंदाज करून चकविले. पवार यांचे राजकीय डावपेच हे फिरकी पेक्षा काही कमी नसतात.त्यावर खेळणे हे त्यांच्या विरोधकांना सहज जमत नाही. साहजिकच त्यांनी टाकलेले बाॅल चव्हाणांना खेळता आले नाहीत.

या दोघांचा खेळ रंगला तो आज पुण्यात. पवार यांचे सासरे व क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या स्मरणार्थ पुणे महापालिकेने मैदान उभारले आहे. त्याचे उदघाटन या दोन नेत्यांच्या हस्ते झाले. आता क्रिकेटचे मैदान असल्याने त्यावर खेळी करूनच त्याचे उदघाटन करण्यात आले.

चव्हाण यांनी आधी बाॅल हाती घेतला होत, तर पवारांनी बॅट पण नंतर पवार यांनी बाॅल ताब्यात घेतला. आणि चव्हाणांना फलंदाजीची संधी दिली. या वेळी जमलेले प्रेक्षक या डावाच्या उत्कंठतेने खूष झाले होते. पवार यांनी दोन फिरकी बाॅल चव्हाण यांना टाकले. चव्हाण यांना ते नेमके खेळता आले नाही.पवारांचे बाॅल टोलवले असते तर ती देखील मोठी बातमी झाली असती. त्यामुळे चव्हाण सावधपणे खेळले, असेच म्हणावे लागेल. पवारांनीही त्यांना आऊट न करता दोन्ही काॅंग्रेसमधील दोस्ताना कायम ठेवला.

HB_POST_END_FTR-A4

.