Pune Political Update: महापालिकेतील पदाधिकारी बदलावर प्रदेशाध्यक्षांचे सूचक विधान!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेतील पदाधिकारी बदलावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी प्रमुख कार्यकर्ते एकत्रितपणे निर्णय घेतात. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान केले आहे.

कोथरूड येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील उपमहापौर बदलाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट नकारही दिला नाही, होकारही दिला नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमुख पदाधिकारी एकत्रितपणे निर्णय घेतला जातो, असे सूचक विधान केल्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

करोना कार्यकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्व निर्णयांशी सहमती दाखवत जवळीक साधल्यामुळे पदाधिकारी बदलण्याची चर्चा उफाळून आली. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून विद्यमान सदस्य पद वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, खासदार गिरीश बापट यांनी देखील सत्ता केंद्र हे कधीच एका व्यक्तीकडे राहात नसतं, ते सामूहिकच असतं, या विधानामुळे ते महापालिकेच्या राजकीय निर्णयात वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.