Pune: केरळपूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू

एमपीसी न्यूज – लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणुन ‘सर्गा क्षेत्र कल्चर आणि चॅरिटेबल सेंटर, कोट्टायम, केरळ या परिसरातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. त्यामध्ये कपडे, अन्नपदार्थ, औषधे व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

लीला पुनावाला फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा फिरोझ पूनावाला, लीला फेलो, रिता शेटिया , करिश्मा तनपुरे, माधुरी नलावडे, कश्मिरा, मरीन यांनी यामध्ये पुढाकार घेतला. कपडे, अन्न, तांदूळ, गहू, साबण, टॉवेल, चहा पावडर, डिटर्जंट अश्या दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे 300 संच केरळ पूरग्रस्तासाठी पाठविण्यात आले आहेत.

रिता शेटीया म्हणाल्या, ‘अतिवृष्टीमुळे केरळचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. त्यामुळे केरळपुरग्रस्तांना ख-या आधार देण्याची गरज आहे. देशभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरु आहे. नुकसान भरुन येण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागणार आहे’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.