pune : शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट…

पुण्यात पुन्हा सत्ताधारी भाजपला पोस्टर बाजीतून लक्ष्य

एमपीसी न्यूज – केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या कारभाराविरोधात मागील चार वर्षाच्या काळात अनेक वेळा शहराच्या प्रश्नाबाबत पोस्टरबाजीतून लक्ष्य करण्यात आले आहे.

तर आज शहरातील अनेक भागात ‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट…’ तुमच्या कारभाराला कंटाळलेला एक पुणेकर अशा आशयाचा मजकूर असलेले पोस्टर शहरातील अनेक भागात लागले आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले जात आहे.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात पाणी तोडल्याप्रकरणी त्याचे पडसाद पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील उमटल्याचे पाहावयास मिळाले. पाणी प्रश्नावरून अनेक घडामोडी घडत असताना. आज पुणे शहरातील अनेक चौकामध्ये भाजप विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

तसेच पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपला पक्षाला बहुमत मिळाले आहे. भाजपकडून पाणी प्रश्न सोडविण्यात अपयशी आल्याने ही पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा एकण्यास मिळत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.