Pune : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रकाश भिलारे

एमपीसी न्यूज- शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रकाश भिलारे यांची निवड झाली आहे. १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत शासनमान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

जुनी पेन्शन, बदली धोरण, वर्ग १ आणि २ मध्ये आरक्षण, माजी सैनिकांना आत्मसन्मानाची वागणूक मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नूतन अध्यक्ष प्रकाश भिलारे यांनी सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कापसे, कोषाध्यक्ष दीपक पाटील, राज्य समन्वयक दिलावर शादीवान उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

अध्यक्ष- प्रकाश भिलारे
उपाध्यक्ष- जगन्नाथ लकडे,
सचिव- बाळासाहेब जाधव
सहसचिव- अमोल पोतदार
कोषाध्यक्ष- निरंजन काकडॆ
सदस्य-
रवींद्र शेवाळे,
शांताराम वाघ
नरेंद्र गायकवाड,
राजेंद्र गायकवाड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.