Pune : जनशक्ती विकास संघाच्या महिला आघाडी अध्यक्षपदी प्रणिता राठी

एमपीसी न्यूज – जनशक्ती विकास संघाच्या पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी प्रणिता प्रकाश राठी यांची आज (मंगळवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ यांनी नियुक्तीचे पत्र राठी यांना सुपूर्द केले.

यावेळी जनशक्ती विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रहीम शेख, महिला प्रदेश कार्याध्यक्ष सीमा दांडगे, महिला शहराध्यक्ष भारती गायकवाड, सुफियान खान, शम्मु कुरेशी, अक्षय बहिरट आदी उपस्थित होते .

नियुक्तीनंतर बोलताना प्रणिता राठी म्हणाल्या, समाजातील तळागाळातील लोकांचे व झोपडवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत. आपल्या कार्यातून व प्रबोधनातून सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचणार असून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.