Pune : प्रशांत जगताप यांना पार्टीच्या नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे – पालकमंत्री

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन काही तास होत नाही. तोवर वडगावशेरी भागात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसा निमित्ताने लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर भावी खासदार म्हणून उल्लेख होता.त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत जगदीश मुळीक यांना सुनावले होते. (Pune) आता त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. त्यामुळे यावर प्रशांत जगताप यांना पार्टीच्या नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Pushpa 2 Trailer : पुष्पा: द रुल चा ट्रेलर यूट्यूब वर व्हायरल; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

त्याच दरम्यान आज पुणे महापालिकेमध्ये विविध विकास कामांबाबत आढाव बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की,भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांना तेरावा असून 16 तारखेला श्रद्धांजली सभा आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत अशा प्रकारची चर्चा करणे चुकीचे असून प्रशांत जगताप यांचे असंवेदनशील मनाच उदाहरण आहे.त्यामुळे प्रशांत जगताप यांना पार्टीच्या नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे. अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली. त्यामुळे आता अजित पवार हे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात हे पाहवे लागणार आहे.

 

 

तर महापालिका निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात  : चंद्रकांत पाटील 

 

राज्य सरकार न्यायालयामध्ये प्रभाग रचने बाबत सादर करीत नाही.राज्यातील महापालिका निवडणुका पुढे जाण्यास राज्य सरकार कारणीभूत नाही का ? त्या प्रश्नावर भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, 9 मे पासून सुप्रीम कोर्ट दीड महिन्याच्या सुट्टीवर जात आहे. (Pune) जर त्यापूर्वी महापालिका निवडणुकी बाबत न्यायालयाने निर्णय दिल्यास नियमानुसार पावसाळ्यात निवडणुका होऊ शकत नाही.त्या दरम्यान प्रभाग रचना त्यावर हरकती आणि सूचना प्रक्रिया होईल.त्यावरून साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.