Pune : ‘लंडन फॅशन वीक’ मध्ये आशिया खंडातील विवाह संस्कृतीचे दर्शन

एमपीसी न्यूज – लंडनमधील हीथ्रो येथे पार पडलेल्या ‘लंडन फॅशन वीक’मध्ये पुण्यातील तष्ट संस्थेच्या युवा फॅशन डिझायनरच्या कल्पकतेला व नावीन्यतेला कौतुकाची थाप मिळाली. यंदाचा फॅशन शो ‘आशिया खंडातील विवाह’ या संकल्पनेवर आधारित होता. या सोहळ्यामधे तष्टतर्फे छत्रपती संभाजी महराजांना समर्पित छावा नावाने पोषाख सादर करण्यात आले.

 

फॅशन कोरिओग्राफर तन्वी खरोटे आणि अभिनंदन देशमुख यांनी पुण्यातील 15 युवक आणि 15 युवतींना या शोसाठी खास प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले होते. पहिल्यांदाच लंडन येथे शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव तष्ट संस्थेने शिवजातस्य या फॅशन शो मधून पेश केले. महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी तसेच इतर सामुग्री फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

 

तष्ट संस्था पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या पोषाखांची निर्मिती करतात जे  शिवकालीन संस्कृती बरोबरच पेशवाई आणि मोघल साम्राज्यातील पेहेरावांशी साधर्म्य साधणारे असतील ज्याद्वारे नवीन पिढीला शिवकालीन वस्त्र परंपरा कशी होती हे कळेल. संस्थेचे प्रमुख वेशभूषाकार रवींद्र पवार म्हणाले की, तरुणाईला भावणारे फॅशन शो हे माध्यम सादरीकरणासाठी निवडले. भविष्यातल्या फॅशनचा कल हा लोकपरंपरा आणि समकालीन वस्त्र यांची सांगड घालणारा आहे.

 

तष्टचे प्रमुख दीपक माने यांनी सांगितले की, अलिकडे काही वर्षांपासून आपल्याकडे विवाह हे विशिष्ट संकल्पना घेऊन आयोजित केले जातात. यामध्ये वर व वधूचे पोषाख त्या संकल्पनेनुसार तयार केले जातात. राजस्थानी, जोधपुरी, पंजाबीच्या बरोबरीनी आता मराठी, शिवकालीन, पेशवाई काळातल्या संकल्पनेला तेवढाच प्रतिसाद मिळत असून अमराठी लोकांकडून शिवकालीन प्रकारच्या पोषाखांना प्राधान्य दिले जाणे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.