Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात 29 एप्रिलला सभा

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना ( Pune ) उमेदवारी दिली. त्यानंतर मोहोळ यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली. ग्रामदेवतांच्या दर्शनाने  त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला.  आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात येणार आहे.

Indian Navy : खडकवासला एनडीएचे माजी विद्यार्थी व्हाईस ॲडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

भाजपने लोकसभेसाठीच्या  उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत पुणे लोकसभा मतदार संघातून  मुरलीधर मोहोळ   यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. तर  त्यांच्याविरुद्ध  महाविकास आघाडीने   रवींद्र धंगेकर  यांना  उमेदवारी दिली आहे. दोघेही जाेरदार प्रचार करत असून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन जाहीर सभा घेणार आहे. पुण्यात  पुण्यात 29 एप्रिलला सप महाविद्यालयाच्या मैदानावर ही  होणार ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.