BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव एस.एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अरुण दादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था पुणे यांनी घेऊन त्यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान केला.हा पुरस्कार नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सुदाम काटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या अगोदरही त्यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार, सृजन कलामंच शैक्षणिकरत्न पुरस्कार तसेच ग्लोबल एज्युकेशन फेलो ऑफ इंटरनॅशनल असोसिएशन सायन्स इम्पॅक्ट पुरस्कार आदी प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सर्व मान्यवर, प्राध्यापक,विद्यार्थी व शिक्षकेतर सेवक आणि शिक्षणप्रेमी नागरिक इत्यादींनी अभिनंदन केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3