Pune : नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, प्रमुख अधिकाऱ्यांची स्मार्ट सिटी कमांड सेंटरला भेट

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथील करोना वॉर रूमला भेट दिली.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, अतिरिक्त आयुक्त (जनरल) व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त (विशेष) शंतनू गोयल उपस्थित होते.

रुबल अग्रवाल यांनी पुणे शहरातील करोना संबंधी सद्यस्थितीची सविस्तर माहितीसह सादरीकरण केले. त्या अनुषंगाने महापौर, आयुक्त यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. संजीव वावरे, आयटी विभागप्रमुख राहुल जगताप, उपायुक्त माधव जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील वाढणाऱ्या करोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत कोरोना वाढत आहे. त्यामुळे या परिसरात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले आहे.

या भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. केवळ दवाखानेच सुरू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.