Pune : मुख्याध्यापक सुरेश शिंदे, वंदना मिरगणे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ सोहळा पुणे येथे उत्साहात पार पडला. यामध्ये मुख्याध्यापक सुरेश शिंदे, शिक्षिका वंदना मिरगणे यांच्यासह राज्यभरातील 46 गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी हेमंत अदाडे, संघटनेचे सचिव सत्यजित जानराव, सोमनाथ शिंदे, नयन इनामदार, प्रा. एस आर पाटील, कृषी विभागाच्या अश्विनी भोपळे आदी उपस्थित होते.

सत्यजित जानराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. शिक्षकाची भूमिका विशद करत त्यांनी शिक्षकांच्या वर्तमान स्थितीबाबत भूमिका व्यक्त केली. अश्विनी भोपळे यांनी नागरिकांच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व सांगितले. आदर्श नागरिकाची जडणघडण शालेय जीवनातून होते. ते शालेय जीवन समृद्ध करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही भोपळे यांनी सांगितले.

प्राचार्य एस. आर. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने आभार मानले. पाटील म्हणाले, “संघटनेने या पुरस्कारासाठी राजहंस निवडले आहेत. संघटना उपेक्षित आणि दुर्लक्षित क्षेत्रातील लोकांसाठी काम करत आहे. ही संघटना पुढील काळात आणखी मोठी झेप घेणार आहे. सर्व पुरस्कार्थी शिक्षकांवर राष्ट्रनिर्मितीची आणखी मोठी जबाबदारी आली असून त्याचे सर्वजण प्रामाणिकपणे निर्वहन करतील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

उमेश काशीद यांनी आंबेडकरवादी विचारांचे गीत सादर केले. सत्यजित जानराव यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ शिंदे यांनी आभार मानले.

गुणवंत शिक्षक :
शेख रफिक अब्दूलगनी (पंढरपूर), शरद किसन पवार (अहमदनगर), त्रिवेणी धोंडिबा झाडे (नांदेड), बाबासाहेब विठोबा शिंदे (मुंबई), सुरेखा भगवान हिंगे (सोलापूर), वैशाली कांतू बांगर (कुसळंब), नामदेव तुकाराम जगदाळे (उस्मानाबाद), ज्ञानदेव कुंडलिक साळवे (रायगड), सरिता सतीश डफळ (पनवेल), अशोक ज्ञानोबा पाचकूडवे (माढा), रमेश संतराम गवळी (सोलापूर), भैय्यासाहेब लक्ष्मण खुणे (उस्मानाबाद), विलास संदीपान वाघमारे (सोलापूर), रमेश नारायणराव ढवळे (लातूर), प्रशांत मधुकर बचुटे (मुंबई), बाळासाहेब भास्कर नांदवटे (सोलापूर), सिद्राम उत्तम पवार (बार्शी), डॉ. राजेश बाबुराव क्षीरसागर (नागपूर), अर्जुन रामा भोई (ठाणे), शिवकन्या निवृत्तीराव कदेरकर (सोलापूर), ससरफराज नवाजहमीद बलोलखान (सोलापूर), भारत जनार्दन मस्के (औरंगाबाद), प्रभाकर मारुती वाघचवरे (सोलापूर), शांतीनाथ नवनाथ नागणे (सोलापूर), सोपान जयसिंग पवार (कळंब), दीपक श्रीपतराव बनसोडे (औरंगाबाद), नूरअहमद मन्सूर अन्सारी (सोलापूर), निजाम गफूर काझी (अकलूज), वैजीनाथ शिवाजी डुकरे (घारी), सदाशिव शंकर पाटील (सांगली), भीमराव विश्वनाथ कदम (बार्शी), संतोष रामचंद्र साळुंखे (बार्शी), सुनीता ज्ञानेश्वर ताम्हाणे (पुणे), सुनीता रघुनाथ निकम (सोलापूर), साबिया सत्तार शेख (दौंड), सतीश सोमनाथ होनराव (बार्शी), शुभांगी जगदीश कलकेरी (सोलापूर), दादाराव पांडुरंग साळुंखे (कराड), चित्रा अजय गवारे (पुणे), भाग्यश्री सत्यजित घोरपडे (पुणे), भारत गणपती कदम (पुरंदर), वैशाली काशीनाथ जाधव (जुन्नर), सुरेश गोपाळ शिंदे (येरवडा), सुनीता फुलवरा शिंदे (पुणे), विजय रामभाऊ चौपटे (पुणे), वंदना नवनाथ मिरगणे (अंजनगाव) आदी गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.