Pune: लघुशंकेचा बहाणा करून येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहातून कैद्याचे पलायन

The prisoner escaped from the temporary prison in Yerwada The

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुरुंग प्रशासनाने तयार केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली. लघुशंकेचा बहाणा करून तो पसार झाल्याची माहिती पुढे आली.

अनिल विठ्ठल वेताळ असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहाचे रक्षक विशाल जाधव त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेताळ विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला येरवडा परिसरात तात्पुरत्या सुरू केलेल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. रविवारी रात्री त्याने लघु शंकेचा बहाणा करत कारागृहातून पळ काढला.

तो पळून गेल्याचे लक्षात येतात कारागृह कर्मचाऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध केली परंतु तो सापडला नाही. अखेर येरवडा पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.