Updated News : ब्रेक फेल झालेल्या खाजगी बसची सहा वाहनांना धडक;  दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण ( Updated News) अपघातात दोघांचा नाहक मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उंड्री परिसरात ब्रेक फेल झालेल्या एका खाजगी बसने सहा गाड्यांना जोरदार धडक दिली आहे. उंड्री परिसरातील तीव्र उतारावर हा अपघात झाला. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात रविवारी रात्री एनआयबीएम ते कडे नगर रस्त्यावर सात वाजण्याच्या सुमारास झाला. 

प्रशांत भानुदास घेमूड (वय 37) याच्यासह आणखी एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका रिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर ससून आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालक मेहनुद्दीन महबूब शेख याला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Baner : घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड लंपास

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भरधाव जाणाऱ्या खाजगी बसचा एन आयबीएम ते कडनगर रस्त्यावरील तीव्र उतारा जवळ ब्रेक फेल झाला. त्यानंतर ही बस भरदाव वेगाने धावत सुटली. समोरून येणाऱ्या सहा वाहनांना या बसने जोराची धडक दिली. यात एका वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भरधाव बसने  तीन मोटारी सह टेम्पो रिक्षा आणि एका  दुचाकीला धडक दिल्याने मोठे नुकसान झाले ( Updated News) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.