Pune: नालेसफाई पाहणी करतेवेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडल्या समस्या

Pune: Problems raised by all party corporators while inspecting sanitation work

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांसह नालेसफाईची पाहणी केली. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या भागांतील अनेक समस्या मांडल्या.

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान व ब्रह्मा हॉटेल समोरील नाल्यातील भिंत काढून घ्यावी, ड्रेनेज लाइन बदलण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक प्रसन्न जगताप व नगरसेविका ज्योती गोसावी यांनी केली.

वडगाव पूल येथील नाल्यात संरक्षक भिंत बांधून स्मशानभूमीतील कामे जलदरित्या पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली.

नगरसेविका राजश्री नवले, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नीता दांगट यांनीही याप्रसंगी चर्चा केली.

येथील फरशी पूल, रुंदीकरण, संरक्षित भिंत बांधणे व वहन क्षमता अडथळा दूर करणेकरिता प्रवाहातील वृक्ष मान्यतेनुसार काढून टाकण्यात यावे, याबाबत नगरसेवक शंकर पवार, आनंद रिठे, अनिता कदम यांनी चर्चा केली.

मित्र मंडळ चौक व ट्रेझर पार्क येथील नाला रुंदीकरण करण्याबाबत नगरसेवक महेश वाबळे, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेविका स्मिता वस्ते यांनी चर्चा केली.

कात्रज तलाव पहाणी प्रसंगी मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक प्रकाश कदम, मनीषा कदम, मानसी देशपांडे, वृषाली कामठे यांनी महापौरांशी चर्चा केली. तलाव परिसरातील पाइपलाइन खालील राडारोडा काढणे, संरक्षक भिंत बांधण्याची त्यांनी मागणी केली.

आंबील ओढा दत्तवाडी परिसरातील नाला कामाची पाहणी करताना उपमहापौर सरस्वती शेंडगे व सभागृह नेते धीरज घाटे यांनी याप्रसंगी उर्वरित कामे जलद करण्याबाबत चर्चा केली.

भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल समोरच्या नाल्यातील कचरा काढून टाकावा, अशी मागणी नगरसेवक अविनाश बागवे, विशाल धनवडे, मनीषा लडकत, अजय खेडेकर, अर्चना पाटील, रफिक शेख यांनी केली.

गणेश पेठेतील बुरुड पूल येथील नाल्यातील चॅनेल काढून रुंदी वाढविणे व पाइपलाइन उचलण्यात यावे, असे वनराज आंदेकर यांनी सांगितले.

मॉडेल कॉलनी पुणे १६ येथील नाला व शिवाजीनगर येथील पटेल टाइल्स नजीकच्या नाल्याचीही यावेळी पाहणी करण्यात आली. नगरसेवक आदित्य माळवे, ज्योस्तना एकबोटे, संदीप काळे, सोनाली लांडगे यांनी येथील नाल्याची रुंदी वाढविणे व गेट बसविणेबाबत सूचित केले.

प्रवाहातील अडथळा ठरणारी वृक्ष मान्यतेनुसार काढण्यात यावे. औध रस्ता परिसरातील चंद्रमनी वसाहती समोरील नाल्यातील अडथळा दूर करावा.

बोपोडी पुलाखालील राडारोडा, चिकन मटण विक्रेते यांचेकडून येथे टाकण्यात येणारा कचरा तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी आरपीआयच्या (आठवले गट) गटनेत्या सुनीता वाडेकर, नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांनी केली.

ब्रेमेन चौक, आशियाना पार्क, विधाते वस्ती, ज्युपिटर हॉस्पिटल येथील पहाणी करण्यात आली. नगरसेवक ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, स्वप्नाली सायकर, अमोल बालवडकर यांनी नालेसफाई, अतिक्रमणे काढणे, संरक्षक भिंत बांधणे याबाबत चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.