Pune : महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त गुरुवारी पुण्यात अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस )तर्फे गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेआठ वाजल्यापासून महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल.आझम कॅम्पस, भवानी पेठ,गंज पेठ ते महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक (समता भूमी) हा या अभिवादन मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. या मिरवणुकीत महात्मा फुले यांच्या मानवतावादी, शिक्षण विषयक, शिकवणुकीचे संदेश देणारे फलक हाती घेतले जाणार आहेत. संस्थेच्या 30 शैक्षणिक आस्थापनातून 5 हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक , विश्वस्त, संचालक तसेच ‘अवामी महाज ‘ या सामाजिक संस्थेचे सदस्य सहभागी होणार आहेत .

या अभिवादन मिरवणुकीचे हे 16 वे वर्ष आहे . संस्थेतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर तसेच प्रेषित महमद पैगंबर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात. आणि मानवतावादी संदेश दिले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.