Pune : प्रा. डाॅ. नीता सुरेश मोहिते यांची पुणे विद्यापीठ अधिसभेवर सिनेट पदावर बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज :

प्रा. डाॅ. नीता सुरेश मोहिते यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune) अधिसभेवर (सिनेट) प्राध्यापक गटातून महिला राखीव पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

 

22 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. 27 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. मोहिते यांच्या विरोधात दोन उमेदवार होते. पण त्या दोन्ही उमेदवारांनी काल त्यांचे अर्ज मागे घेतल्याने आज मोहिते यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Covid News : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक

मोहिते या 30 वर्षे अध्यापन क्षेत्रात काम करत आहेत. त्या गेली 26 वर्षे डी. वाय. पाटील कला, वाणिज्य (Pune) व विज्ञान महाविद्यालयात कार्य करत आहेत. त्या महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून आता कार्यरत आहेत. त्या म्हणाल्या की, “मी येणारे शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी काम करणार आहे. तसेच विद्यार्थी केंद्रीत शिक्षण व्यवस्था होण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.