Pune : आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी मागासवर्गीय कल्याण निधीचा योग्य वापर करा – डॉ. सिद्धार्थ धेंडे

एमपीसी न्यूज – अधिकाऱ्यांच्या (Pune) उदासीनतेमुळे मागासवर्गीय कल्याण निधीचा पूर्ण खर्च केला जात नाही. या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही. त्याबाबत अनेक तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी मागासवर्गीय कल्याण निधीचा योग्य वापर करा, अशा सूचना पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक आयोजित करण्यासाठी डॉ. धेंडे यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त खेमणार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी महापालिकेच्या समाज विकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. धेंडे यांनी काही बाबी निदर्शनास आणून देत बदल करण्याची सूचना केली.

Pune Police : 2 लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर ACB ची कारवाई

या बैठकीत डॉ. धेंडे म्हणाले की, गेल्या पाच (Pune) वर्षामध्ये मागासवर्गीय कल्याण योजनेंतर्गत एका रुपयाच्या निधीची देखील वाढ झालेली नाही. महापालिकेचा समाज विकास विभाग निधीमधील संपूर्ण रक्कम पूर्ण खर्च करत नाही. विभागाकडील उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. अधिकारी व कर्मचारी हा निधी खर्च करण्यात उदासीन असल्याचे दिसते. अधिकाऱ्यां उदासीनतेमुळे गरजू लोकांपर्यंत योजना पोहचत नाही.

मागासवर्गीय कल्याणमधील निधी खर्च करताना अनेक अटी-शर्ती या बेकायदेशिर व किचकट पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बदल करायची गरज असल्याचे डॉ. धेंडे यांनी सुचविले. तसेच अनेक नविन योजनांचा समावेश करायला पाहिजे. त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ होईल. हा निधी मागास घटकाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी खर्च करायला महापालिका प्रशासनाने तत्परता दाखविण्याची सूचना केली.

प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घ्या –

महापालिका राबवित असलेल्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. मागासवर्गीय कल्याण योजनाही त्यापैकीच एक आहे. या योजनेचा पूर्ण निधी योग्य लाभार्थ्यांसाठी खर्च करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.