_MPC_DIR_MPU_III

Pune Property Tax News : अभय योजनेअंतर्गत अवघ्या 15 दिवसात 44 कोटी 25 लाख रुपये जमा

महापालिकेच्या सवलतीनंतर तिजोरीत पुणेकरांचा उदंड प्रतिसाद; पुणे महापालिकेकडून दिली 21 कोटी 18 लाख रुपयांची सवलत

एमपीसी न्यूज : थकित मिळकतकर वसुलीसाठी पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 15 दिवसात 44 कोटी 25 लाख रुपयांचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पुणे महापालिकेच्या हद्दीत सुमारे 10 लाख 61 हजार मिळकती आहेत. मिळकतकर थकविणाऱ्या नागरीकांना एकूण रकमेवर दरमहा 2 टक्के शास्ती कर लावण्यात आला होता. कोरोना काळात ही रक्कम वाढत गेल्यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे महसूल बुडत होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर दिलासा देण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबर ते 31 नोव्हेंबर दरम्यान अभय योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये थकित मिळकतकराममध्ये सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत 500 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले.

गेल्या 15 दिवसांमध्ये अभय योजनेला पुणेकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे एकूण जमा झालेल्या रकमेवरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत 18 हजार 794 मिळकतकर धारकांनी 44 कोटी 25 लाख रुपयांचा भरणा पालिकेच्या तिजोरीत भरणा केला.

आगामी काळात पुणेकरांकडून असाच प्रतिसाद मिळाल्यास पालिकेचे 500 कोटी रुपयांचे उद्दिष्ठ पूर्ण नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.