Pune: प्रत्येक केशकर्तनालय मालकास 5 हजार रुपये मदत देण्याचा प्रस्ताव

Pune: Proposal to provide assistance of Rs. 5,000 to each hairdresser भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या प्रस्तावावर स्थायी समितीत 14 जुलैला होणार निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सलून दुकानदारास प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत करावी, असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी स्थायी समितीला सादर केला आहे. येत्या मंगळवारी (दि. 14 जुलै) सकाळी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. 

कोरोना विषाणू महामारीमुळे सर्व मानव समाजावर परिणाम झाला आहे. असंख्य छोटे – मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यातीलच  केश कर्तनालय व सलून व्यावसायिक हा एक मुख्य घटक आहे. गेल्या 4 महिन्यांपासून हा व्यावसायिक मोठ्या अडचणीतून जात आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्यांचे प्रकारही घडले आहेत.

अनलॉकच्या प्रक्रियेत कडक अटी आणि शर्तीवर या व्यवसायाला परवानगी मिळाली. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यात 4 महिने व्यवसाय बंद असल्याने असंख्य देणी बाकी आहे. तसेच कौटुंबिक उपजीविका भागवणेही अवघड झाले आहे.

पुणे शहरात असंख्य हातावर पोट असलेले सलून व्यवसायिक असून, त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे या सलून दुकानदारास प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी हरिदास चरवड यांनी केली आहे. त्यावर स्थायी समिती काय निर्णय घेणार, याकडे सलून व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.