Pune : पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या -संजय भिमाले

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या संकटामुळे संपूर्ण जनता लॉकडाऊनमध्ये घरी सुरक्षित असताना शासनाकडून येणारे सूचना तसेच कोरोना संदर्भातील प्रत्येक बातमी आणि मदत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या माध्यमातील कर्मचारी तसेच पत्रकारांना शासनाने त्वरित विमा जाहीर करावा, अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजय भिमाले आणि पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

‘कोरोना’च्या संकटामुळे संपूर्ण जनता लॉकडाऊनमध्ये घरी सुरक्षित असताना उच्चस्तरीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, मिडीया हे मात्र, जिवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करून कोरोना संदर्भात उपचार व जनजागृती करीत आहेत.

शासनाने कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व पोलिसांना विमा संरक्षण जाहीर केलं आहे. परंतु कोरोना संदर्भातील प्रत्येक घटना जनसामान्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचावी याकरिता दिवस-रात्र झटून माध्यमांमध्ये काम करणारे कर्मचारी, पत्रकारांना, वृत्तपत्र विक्रेता, वृत्तपत्र टाकणारे कर्मचारी यांना कोणतेही विमा संरक्षण जाहीर करण्यात आले नाही.

जिवाची पर्वा न करता शासनाकडून येणारे सूचना व कोरोना संदर्भातील प्रत्येक बातमी तसेच दिली जाणारी मदत यांची माहिती सतत जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. त्यामुळे माध्यमातील कर्मचारी,पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र टाकणारे कर्मचारी यांना देखील शासनाने त्वरित विमा जाहीर करावा, अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजय भिमाले आणि पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.