Pune : पोलीस भरती बदलाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा मोर्चा

एमपीसी न्यूज – पोलीस भरती प्रक्रियेतील केलेल्या बदलाच्या निषेधार्थ पोलीस भरती स्टुडंट राइट्सच्या नेतृत्वाखाली पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी आणि स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी विद्यार्थिनींसह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

  • नदीपात्रात, शनिवारवाडा, लाल महाल चौक, फडके हाैद चाैक, दारुवाला पूल, नरपतगिरी चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय मार्गाने मोर्चा काढण्यात आला. एक लढा, आपल्या न्याय हक्कांसाठी’, नवीन जीआर रद्द झालाच पाहिजे, पोलीस भरती पूर्वरत झालीच पाहिजे, ‘उठ तरुणा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो’, 100 गुणांची मैदानी चाचणी झालीच पाहिजे, मैदानी चाचणी प्रथम झालीच पाहिजे, अशी फलके घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. तर सरकारविरोधात विद्यार्थी वर्गाने जोरदार घोषणाबाजी केली.

ही मुलं धावत निघाली तेव्हा कोणी अडवल नाही. मात्र, अचानक सूत्र हलली आणि खिडकीजवळ त्यांना अडवण्यात आलं. पोलिस भरतीमध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात पुण्यातील हजारो तरुण-तरुणींनी आज मोर्चा काढला होता. त्यानंतर पन्नास मुलं पुण्याहून मुंबईला धावत निघाली होती.

  • पुण्याहून मुंबईला धावत निघालेल्या ५० तरुणांना पुणे पोलिसांनी खडकीमधे अडवलं. अडीचशे ते तीनशे पोलिसांचा ताफा त्यासाठी तैनात करण्यात आला. या तरुणांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि दोन ते तीन तास बसवून ठेवण्यात आलं. त्यानंतर प़ोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेऊन सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.