Pune : श्रीलंकेतील स्फोटाच्या निषेधार्थ उद्या निषेध सभा

एमपीसी न्यूज- श्रीलंकेत आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आणि निरपराध मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी उद्या, गुरुवारी (दि.25) सायंकाळी 6 वाजता बिशप स्कुलच्या जीजीभॉय मैदानात सर्वधर्मीय निषेध आणि शोकसभा आयोजित करण्यात आली आहे .

या निषेधसभेला पुणे प्रांताचे बिशप थॉमस डाबरे ,चर्च ऑफ नॉर्थ इंडिया चे बिशप राईट रेव्हरंड पॉल धुपारे ,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी . ए . इनामदार यांच्यासह धर्मगुरू ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेचे निमंत्रक एडव्होकेट मार्कस देशमुख ,बिशप स्कुलचे प्राचार्य आणि सचिव जोएल एडविन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.