Pune : पुणे, पिंपरी चिंचवड मधील कॅब चालकांचे 20 फेब्रुवारी पासून आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune) शहरातील कॅब चालक 20 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार आहेत. कॅब चालक आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने देखील करणार आहेत. यामुळे शहरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

कॅब सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास टाळाटाळ करत असल्याचे कॅब चालकांचे म्हणणे आहे. पुणे आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालकांकडून निदर्शने आणि बेमुदत बंद आंदोलन केले जाणार आहे.

PCMC : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश, स्वेटर खरेदीस मान्यता

प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. 1 जानेवारी 2024 पासून नवीन दर लागू झाले आहेत. ओला, उबर यांसारख्या कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाहीत. याचा फटका कॅब चालकांना बसत आहे.

नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या (Pune) कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी केली नसल्याचे कॅब चालकांकडून सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.