Pune : मेधा कुलकर्णीं यांना ‘स्टंट’ वक्तव्य भोवणार ; मराठा आंदोलक आक्रमक !

एमपीसी न्यूज- आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलं होत. मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी मेधा कुलकर्णींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.