Pune : आयुर्वेदिक-होमिओपॅथिक औषधे उपलब्ध करून द्या : आबा बागुल 

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव ते जिल्हा पातळीवर आयुर्वेदिक -होमिओपेथिक औषधे उपलब्ध करून द्या, अशी मागणी माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. 

यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविले आहे. त्यावर आपले पत्र प्राप्त झाले असून संबंधित खात्याला कारवाईसाठी पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यलयाने म्हटले आहे.  सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी ठोस उपायोजना होत असल्या तरी अटकाव घालण्यासाठी प्रभावी औषध, लस अजून निर्माण झालेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असला तरी दुसरीकडे  छोटे – मोठे आजार बळावत आहेत. आगामी  काळात त्यात पावसाळी आजारांची भरही पडणार आहे. त्यामुळे आपल्याकडे हजारो वर्षांची प्रभावी उपचारांची परंपरा असलेल्या आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिकचे औषधे उपयुक्त ठरणार आहेत. रामदेव बाबा यांचे पतंजली, वैद्य खडीवाले, आयुर्वेदिक रसशाळा यासह समाजासाठी  आरोग्याचे व्रत घेतलेल्या नामांकित आयुर्वेदिक संस्थांना  गावपातळी ते जिल्हापातळीवर ठिकठिकाणी उपचारासाठी  शासनामार्फत क्लिनिक सुरु करण्याचे आवाहन करण्याची नितांत गरज आहे.

त्यासाठी दर एक हजार लोकसंख्येसाठी एक क्लिनिक हे सूत्र असावे. नागरिकांचा आयुर्वेदाकडे वाढता कल पाहता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आरोग्य यंत्रणेवर ताणही  पडणार नाही, असेही बागुल यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.