Pune: कंत्राटी कामगारांना रोजगार द्या, आयुक्तांकडे मागणी

Pune: Provide employment to contract workers, demand to the pmc Commissioner अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तातडीने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटी कामगारांना रोजगार उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- नागरी सुविधा केंद्रातील निविदा प्रक्रिया राबवून गेली दहा वर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी कामगारांकडून महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

ना हरकत प्रमाणपत्र, नाव हस्तातरंण प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले आदी महत्वपूर्ण कामे राबविण्यात येणाऱ्या शेकडो कंत्राटी कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

गेल्या दहा वर्षांत हे काम निविदा पध्दतीने तीन-तीन वर्षे मुदतीसाठी विविध कंपन्यामार्फत करण्यात येतात. कामगार तेच आहेत. एका कंपनीकडे असलेल्या या कामाचा कालावधी संपल्याने त्यांना मार्च २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती.

मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या कामाची पुन्हा निविदा काढण्यात आली नाही. त्यामुळे कंपनीचे काम संपुष्टात आले आहे. त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत.

अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तातडीने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटी कामगारांना रोजगार उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.