Pune : कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करा- रुग्ण हक्क परिषदेची मागणी

Provide free treatment to patients with coronary heart disease-Demand for Patient Rights Council

राज्यातील तब्बल १०६ तहसीलदार कार्यालयांमार्फत पाठविले पंतप्रधनांना पत्र

एमपीसी न्यूज – कोरोनाचे उपचार खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयात मोफत झाले पाहीजेत, तसेच या उपचारांसाठी रुग्णांनी आतापर्यंत भरलेल्या लाखो रुपयांच्या बिलाचा रिफंड मिळाला पाहिजे.  कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना घरटी दहा हजार रुपये द्यावेत, अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी परिषदेच्या राज्यातील सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागण्यांचे निवेदन देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या अवाहनास परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

राज्यातील १९ जिल्ह्यातील तब्बल १०६ तालुक्यातून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची किमान सातजणांचे शिष्टमंडळ तयार करून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले.

यामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रामुख्याने पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, रायगड, पालघर, अहमदनगर, बीड जिल्ह्यातील सरासरी आठ तालुक्यातील म्हणजेच तब्बल १०६ तालुक्यातून सुमारे ३०० हुन अधिक शिष्टमंडळानी तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित मागण्या मान्य होइपर्यंत लढा देणार असल्याचे सूतोवाच केले.

पुणे शहर तहसीलदार यांना परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन सादर केले. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात केंद्रीय सचिव दीपक पवार, सामाजिक कार्यकर्ते विकास साठे, संतोष सरोदे, आनंद बहिरट, दिव्या कोंतम, रफिक शेख, भरत चव्हाण, उमर शेख, नरेश भोसले, प्रशांत गायकवाड सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.