Pune : आयटी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या; आयटी कामगार संघटनेची मागणी

Provide 'work from home' to IT workers; IT trade union demand

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सोमवार (दि.13) पासून दहा दिवसांसाठी कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत आयटी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या अशी मागणी आयटी कामगार संघटनेने केली आहे. 

याबाबत आयटी कर्मचारी संघटनेने याविषयी निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र लिहिले आहे. सोमवार पासून पुणे, पिंपरी चिंचवड व आसपासच्या गावांमध्ये 13 ते 23 जुलै दरम्यान कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, या लाॅकडाऊन मध्ये सर्व आय टी कर्मचार्यांना ( केपीओ, बीपीओ, आयटीईएस ) सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याची मागणी या पत्रात केली आहे.

या पत्रात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता आय टी, केपीओ, बीपीओ, आयटीईएस कर्मचार्यांना

सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे. तसेच त्यांच्या कंपनी कडून कामावर हजर राहण्याची  सक्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. आयटी कंपन्या कर्मचार्यांना कामावर हजर राहण्यास सक्ती करत आहेत तसेच, कर्मचारी कपात व वेतन कपातीच्या तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे या कर्मचार्यांना सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.