Pune : अभिनेत्याकडून खंडणी एक लाख रुपयांची उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास अटक

एमपीसी न्यूज- एका अभिनेत्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षकास रविवारी (दि. 23) अटक करण्यात आली. गुन्हे शाखेने वरील कारवाई केली.

अमोल विष्णू टेकाळे (वय 32 रा. पोलीस वसाहत स्वारगेट ) असे या प्रकरणी अटक झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष दत्तात्रेय यादव (वय 28) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यापूर्वी या प्रकरणी अभिनेत्री रोहिणी माने व राम जगदाळे याना अटक करण्यात आलेली आहे. आणखी एक आरोपी सारा गणेश सोनावणे ही फरार असून तिचा शोध चालू आहे.

याबाबतची माहिती अशी की, रोहिणी माने यांच्या विरोधात यादव यांनी वानवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीत अर्ज दिला होता. चौकशीसाठी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले असता स्वच्छतागृहात जाताना यादव यांनी विनयभंग केल्याची तक्रार माने यांनी केली होती. त्यामुळे यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव आणि माने यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी उपनिरीक्षक टेकाळे याने यादव याना कार्यालयात बोलावून गुन्हा मिटवण्यासाठी माने यांची माफी मागायला लावली. त्याचे चित्रीकरण करून यादव यांच्याकडे 15 लाखांची मागणी केली. त्यापैकी 1 लाखाची रक्कम स्वीकारण्यात आली होती. उर्वरित रक्कम न दिल्यास खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू अशी धमकी टेकाळे याने यादव यांना दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.