Pune : रूरल इंडिया हस्तकला प्रदर्शनात पोलिसांचा जनजागृती स्टॉल

एमपीसी न्यूज – कॅम्युनिटी पोलिसिंग, बडी कॉप, पोलीस काका, सायबर सेल, वाहतूक शाखा, भरोसा सेल सारख्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशने पोलीस ओपन ग्राउंड औंध येथे सुरु असलेल्या रूरल इंडिया हस्तकला प्रदर्शनात पोलिसांचा स्टॉल लावण्यात आला आहे.

नागरिकांना पोलिसा तर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती व्हावी यासाठी कॅम्युनिटी पोलिसिंग, बडी कॉप, पोलीस काका / दीदी , सायबर सेल, वाहतूक शाखा, भरोसा सेल, महिला सुरक्षा सेल, जेष्ठ नागरिक, विशेष बाल सुरक्षा पथक याच्या कामकाजाची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना पत्रके देऊन जनजागृती केली जात आहे तसेच पोलीस दलात वापरण्यात येणारे दारुगोळे आणि शस्त्रात्रे या बद्दलची माहितीही नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांनी या स्टॉल ला आवर्जून भेट द्यावी आणि पोलिसांच्या विविध प्रकल्पांची माहित करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ८ मार्च पर्येंत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.