Pune : पौष पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सत्यनारायण पूजेचे आयोजन; वैश्य समाजाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पौष पौर्णिमेपासून (Pune) वैश्य समाज आणि अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गोशाळेत सर्व हितकारक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्या अतंर्गत सार्वजनिक सत्यनारायण पूजा देखील घालण्यात आली.

पूर्वी पौष पौर्णिमेला घरोघरी सत्यणाराण पूजा होत असे. मात्र, ते आता काही कारणास्तव शक्य नसल्याने आपल्या धार्मिक भावना अतृप्त राहिल्या आणि येणाऱ्या पिढ्या धर्माबाबत अनभिज्ञ होत आहेत. धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी या पौष पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा एकत्र करण्याचे नियोजन वैश्य समाजाने केले आहे. यासाठी सत्यनाराणायच्या पूजेबरोबर हनुमान चालिसा पठण आणि गायीची पूजा करून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

Vadgaon Maval : मनसे नगरसेविका सायली म्हाळसकर यांच्या ‘संपर्क अभियाना’स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्या मध्ये 20-25 कुटुंबे येऊन कथेचे लाभ घेणार आहेत. पहिल्या कथेत सुधीरकुमार अग्रवाल कुटुंब-पिंपरी, राजेश प्रेमचंद गर्ग कुटुंब-विश्रांतवाडी, पुणे आणि आत्माराम चंपालाल अग्रवाल कुटुंब-वाघोली, पुणे यांना प्रति कुटुंब 1 हजार 100 रुपये देऊन यजमानपद मिळाले. भोसरी येथील पंडितजी वासुदेव दास यांनी पौरोहित्य अत्यंत कुशलतेने पार पाडले आणि आपल्या खास शैलीत कथा कथन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कथा, गाईपूजन व उपस्थित सर्वांच्या हस्ते आरती झाल्यानंतर सामूहिक हनुमान चालिसाचे पठण (Pune) करण्यात आले व सुका मेवा मिश्रित रवा खीर, फळे व हलवा तसेच पुष्पगुच्छ वाटप करण्यात आले.

उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाला भरभरून पाठिंबा दिला आणि पुढील महिन्यात प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत इतर भक्तांना नक्कीच घेऊन येईल असे सांगितले.

दर महिन्याला वेगवेगळ्या पंडितजींच्या कथा वाचल्या जातील. दिवाळीनंतर पौर्णिमेला सर्व 12 पंडितजींच्या उपस्थितीत सप्तधेनु पूजन आणि महाप्रसाद (अन्नकुट) आयोजित केला आहे. सर्व पंडितांना पंच-वस्त्र, पंच-भांडी आणि पंच-दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संयोजक फॉरवर्ड-सुधीरकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.