Pune : सुशील दुधाणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – सह्याद्री ट्रेकेर्स फाउंडेशन व भटकंती…गड दुर्गाची यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुशील दुधाणे लिखित आणि नाविन्य प्रकाशन यांनी ‘घाट वाटा’ हे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशन समारंभ नुकताच पुण्यात झाला.

पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसिद्ध लेखक आनंद पाळंदे यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनचे संस्थापक सुरेंद्र दुगड हे होते. प्रमुख पाहुणे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, गिरीप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे, गडसंवर्धनचे सदस्य चंद्रशेखर शेळके, तंजावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यकोजी यांचे चौदावे वंशज युवराज राजे भोसले, प्र.के.घाणेकर आदी उपस्थित होते.

  • तसेच काही शिलेदारांचा ‘सह्याद्री भक्त’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कु.साई सुधीर कवडे, कु.कृष्णा उमेश कोंडे,  भगवान चवले (एवेरेस्ट वीर), अनिल वाघ (लिंगाणा वीर), मारुती गोळे (आग्रा वीर, दुर्ग वीर) या सर्वांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना कु.सायली सुशिल दुधाणे हिने लिहली आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल नलावडे यांनी केले. तसेच आभार राजेंद धुमाळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.