Pune : शहरी गरीब वैद्यकीय योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करा; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचा आदेश

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करा, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिले आहेत.

या योजनेची लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. यामध्ये बोगस लाभार्थी वाढत असल्याने एकूण लाभार्थ्यांची यादी प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर करावी़, असेही रासने यांनी बजावले आहे. तसेच, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेतून किती आजी – माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी लाभ घेतला, त्याची माहितीही द्यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

शहरी गरीब गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ शहरातील गरीब नागरिकांनाच अधिकाधिक मिळावा अशी अपेक्षा आहे़ मात्र, आजमितीला अनेक बोगस लाभार्थी या योजनेत आल्याच्या तक्रारी आल्या आहेत़ त्याअनुषंगाने पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित योजनेतील लाभार्थ्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही योजना गोरगरीब नागरिकांसाठी असून त्यामध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचा आरोप माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केला. अनेक हॉस्पिटलसुद्धा या योजनेचा गैरवापर करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like