Pune : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘लॉकडाऊन’ नाही ; पण नियमांचे पालन करावेच लागणार : सौरभ राव

Pune-Pimpri chinchwad Lockdown Update saurabha rao Information

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी – चिंचवडमध्ये शुक्रवार (दि. 24 जुलै) पासून लॉकडाऊन वाढणार नाही. पण, 13 जुलैच्या पूर्वी शासनाने व महापालिकांनी लागू केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल, अशी महत्वपूर्ण माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे  विशेष अधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार लागू केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन गुरुवारी (दि. 23 जुलै) संपत आहे. येत्या 24 जुलै पासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 13 जुलै पूर्वीचीच परिस्थिती राहणार आहे. दुकाने, खासगी कार्यालये सुरू राहणार आहेत, असेही सौरभ राव यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी – चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

शनिवार, रविवार किंवा मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी यापुढे लॉकडाऊन लागू करण्याचा विचार सुरू आहे. पुण्यात लागू केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांत दिसतील.

कोरोनाची सकाळी तुटल्याने रुग्ण कमी होतील. दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी ठेवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले.

केंद्र सरकारने लागू केलेले 31 जुलै पर्यंतच्या लॉकडाऊनचे नियम पाळण्यात येणार आहे. दरम्यान, 10 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आणखी लॉकडाऊन नको, अशी आक्रमक भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.