Pune : ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेने मदत करावी : नयना गुंडे

Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation should help PMP employees: Nayana Gunde

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या कायम कर्मचाऱ्यांसह रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीला मदत करावी, अशी मागणी पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी मंगळवारी नयना गुंडे यांची भेट घेऊन रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची मागणी केली. त्यावर या कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून वेतन दिले नाही.

कायम आणि रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध नाही. जर कायम कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाही, तर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेतन कसे देणार, असा सवाल गुंडे यांनी उपस्थित केला.

तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे कर्मचारी काम करतील, त्यांनाच वेतन द्यावे, असे सांगण्यात आले आहे. या दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेने मदत करावी, असेही गुंडे म्हणाल्या.

यावेळी दीपाली धुमाळ म्हणाल्या, ‘पीएमपीएमएल’च्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 2 हजार 169 कामगारांना पगार नाही. यामध्ये कंड्क्टर, ड्रायव्हर, वर्कशॉपमध्ये काम करणारे सेवक आहेत. त्यामुळे रोजंदारी पदावरील सेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यामध्ये काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात. रोजंदारी पदावरील सेवकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस होतो. परंतु, एप्रिल २०२० या कालावधीतील पगार अद्यापही अदा करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार घरी राहावे लागत असले तरी ते कर्मचारी कामावर आहेत, असे समजून त्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात यावे.

सद्यस्थितीत कोरोनामुळे पुणे शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. परिणामी सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना उपस्थित केला. यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.