Pune : पुण्यातील उद्योजकाने विकसित केले ‘कोरोना किलर’ इलेक्ट्रॉनिक उपकरण

Pune: Pune-based entrepreneur develops electronic 'corona killer' device पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीच्या या उपकरणाला ICMR आणि NIV कडून मिळाले कार्यक्षमता प्रमाणपत्र 

एमपीसी न्यूज – आयनायझेशनच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) तर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीने संशोधित केलेले आणि मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे . 

कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘कोरोना किलर ‘ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते कोणत्याही बंदिस्त परिसरात वापरता येते.

घर, हॉस्पिटल, शाळा, हॉस्पिटल, गाड्या, विमान, प्रयोगशाळा, क्वारंटाईन सेंटर, कारखाने, मंदिरे अशा कोणत्याही ठिकाणी ते वापरता येते.  या इलेक्ट्रॉनिक उपकरणास ICMR व NIV तर्फे मान्यता देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. कोविड रुग्णाचे मास्क, हातमोजे, बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.

पुण्यातील शिवणे भागात असलेल्या या कंपनीमध्ये या उपकरणाचे उत्पादन सुरु असून दररोज 200 उपकरणे निर्मितीची कंपनीची क्षमता आहे . ही क्षमता दररोज 700 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व नियम पाळून वाहतुकीसाठी सरकार सहकार्य करील, अशी अपेक्षा भाऊसाहेब जंजिरे यांनी व्यक्त केली आहे. या उपकरणाचा पुरवठा देशात आणि देशाबाहेरही केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like