Pune : भाजीपाला पाठोपाठ पुण्याचा ‘भुसार बाजार’ही बंद!; जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची भीती

एमपीसी न्यूज – भाजीपाला, फळे बंद केल्याच्या पाठोपाठ पुण्याचा ‘भुसार बाजार’ही बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या कोरोनाचे संकट आहे गंभीर आहे. सर्वसामान्य पुणेकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस, व्यापाऱ्यांनी समनवयाने मार्ग काढण्याची मागणी करण्यात येत आहे. गर्दी टाळून ठरावीक वेळेला ही दुकाने सुरू करावीत, सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

भुसार बाजार बंद झाला तर पुणेकरांना किराणा माल मिळणे अवघड होणार आहे. दुसरीकडे पुणेकरांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणविणार नसल्याचे पुणे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, पुण्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील भवानी पेठेत तब्बल 11 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पुणेकरांनी घरातच राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.