_MPC_DIR_MPU_III

Pune : पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज- पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पाटील, खासदार मा.संजय काकडे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील कांबळे उपस्थित होते.

शेट्टी हे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून काँग्रेसतर्फे इकचुक होते. परंतु त्यांना डावलून काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा उमेदवारी दिल्यामुळे शेट्टी नाराज झाले होते. शेट्टी यांच्या भाजप प्रवेशामुळे बागवे यांची डोकेदुखी वाढली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.