Pune Corona Effect : यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही

हे दोन्ही सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्याची वेळ आली आहे. ; Pune: Corona effect; This year there is no donation for Dahihandi and Ganeshotsav

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही. त्यामुळे हे दोन्ही सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे प्रत्येक मंडळाला 5 – 10 हजार वर्गणी देण्याचा खर्च नगरसेवकांचा वाचला आहे.

दरवर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गल्लीबोळातील मंडळांना वर्गणी द्यावी लागत होती. या वर्गणीपोटी नगरसेवकांना साधारण 20 ते 25 लाखांचा भुर्दंड पडत होता. यावर्षी त्या खर्चात बचत झाली आहे.

सार्वजनिक दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना इच्छुक उमेदवार आणि नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात वर्गणी मिळत असते.

दहीहंडी उत्सवात हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नट – नट्यांना मोठी मागणी असते. विशेषतः वाघोली, नगररोड, बावधन, बाणेर – बालेवाडी, कोथरूड, कर्वेनगर – वारजे, कात्रज, हडपसर, वडगांव, सिंहगड रोड परिसरतील दहीहंडी आकर्षक असते. त्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते.

दहीहंडीत दरवर्षी लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येत असतात. यंदा मात्र गोविंदाचा सरावही होणार नाही. तर, दुसरीकडे ढोल – ताशांचा आवाजही शांत झाला आहे.

यावर्षी या सर्व खर्चाला फाटा देण्यात येत आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करण्यासाठी वर्षभरापासूनच मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू असते.

यावर्षी अभूतपूर्व अशा कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.